CSK IPL 2020 Playoff Chances: चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाची मालिका सुरूच, पण अद्यापही प्लेऑफ गाठण्याची संधी, पाहा कसे

मात्र, संघ चार वेळाच्या चॅम्पियन्सकडून पराभूत झाल्यानंतर पूर्णपणे स्पर्धेतून बाहेर पडला आहेअसे म्हणणे चुकीचे ठरेल. 

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स  (Photo Credit: PTI)

CSK Playoff Chances IPL 2020: मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) शारजाह येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या आयपीएलच्या 41व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) निराशाजनक कामगिरी सुरू ठेवली आणि पहिले फलंदाजी करत 9 विकेट गमावरून 114 धावा केल्या. आणि यासह आयपीएल (IPL) 13च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता कमी आहे. प्रथम फलंदाजीस येताना, 'यलो आर्मी'ची भयानक सुरवात झाली. एमआय (MI) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी नवीन चेंडूने घातक हल्ला केला, परिणामी सीएसकेने (CSK) याच्या 3 धावांवर 4 विकेट गमावल्या. आयपीएलच्या इतिहासातील सीएसकेचे आघाडीचे फलंदाज असहाय दिसत होते आणि स्कोर बोर्डवर तीन किंवा त्यापेक्षा कमी धावांवर चार विकेट गमावणारे ते आयपीएलच्या इतिहासातील दुसरे संघ बनले. यानंतर संघ पुनरागमन करू शकला नाही नियंताराने विकेट गमावत राहिला. (CSK vs MI, IPL 2020: सीएसके गोलंदाजांवर ईशान किशन-क्विंटन डी कॉकच्या जोडी भारी; मुंबई इंडियन्सने 10 विकेटने मिळवला दणदणीत विजय)

पण, सॅम कुरने संयमी डाव खेळला आणि सीएसकेला शंभरी पार करून दिली. शिवाय, मुंबईला दिलेल्या लक्ष्य त्यांच्या फलंदाजांसाठी नव्हते आणि ते त्यांनी सिद्ध करत सहज विजय नोंदवला. तथापि, एमएस धोनीच्या नेतृत्वातील संघ चार वेळाच्या चॅम्पियन्सकडून पराभूत झाल्यानंतर पूर्णपणे स्पर्धेतून बाहेर पडला आहेअसे म्हणणे चुकीचे ठरेल. 'येलो आर्मी'ने त्यांचे आगामी सर्व सामने जिंकले आणि गुणतालिकेत 14 पॉईंट्स मिळवले तर त्याच्याकडे पहिल्या-4 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. शिवाय, पहिले तीन संघ-मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, इतर तळाशी असलेल्या संघांविरुद्ध विजय मिळवतील अशी अपेक्षा सीएसकेला असेल.

एमआयकडून पराभूत झाल्यानंतरही सीएसके अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार नाही. जरी परिस्थिती अत्यंत कठीण तरीही तरीही सीएसकेसाठी थोड्याफार संधी उपलब्ध आहेत. चेन्नईचा रन-रेट (-0.463) हा सर्व संघांमधील तिसरा सर्वात दर्जा आहे आणि एमआयकडून पराभूत झाल्यानंतर ते खाली खाली येण्याची शक्यता आहे, त्यांना उर्वरित तीन सामने मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सने फक्त एक सामना जिंकण्याची, तर सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांनी जास्तीत जास्त दोन सामने जिंकण्याची अपेक्षा केली पाहिजे. वर नमूद केल्याप्रमाणे हे समीकरण अगदी अशक्य आहे, परंतु एसआरएचने देखील 12 गुणांसह मागील वर्षी प्लेऑफ फेरी गाठली होती तथापि, त्यांचा नेट रनरे तळाशी असलेल्या संघांपेक्षा चांगला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif