Suresh Raina ने केला आपल्या First Crush चा खुलासा; कॉलेज जीवनात 'या' मराठी अभिनेत्रीसोबत डेटवर जाण्याची होती इच्छा
‘Zing Game On’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सुरेश रैनाने आपल्या पहिल्या क्रशचा खुलासा केला आहे. या कार्यक्रमात रैनाने क्रिकेट, संगीत, त्यांचे प्रेम, सेलिब्रिटी क्रश आणि इतरही बऱ्याच विषयावर भाष्य केलं.
Suresh Raina First Crush: बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातील संबंध तसा खूपचं जुना आहे. एमएके पटौदी, मोहम्मद अझरुद्दीन, हरभजन सिंग, युवराज सिंग, विराट कोहली असे काही क्रिकेटपटू (Cricketers) आहेत, ज्यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली. अलीकडेचं हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) बॉलिवूड अभिनेत्री दिवा नताशा स्टेनकोविकशी लग्न केलं. तसेच के. एल. राहुलने देखील अथिया शेट्टीशी आपलं नातं उघड केलं आहे.
भारतीय क्रिकेटमधील जवळजवळ सर्वच नावे बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडली गेली आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र, यास सुरेश रैना (Suresh Raina) अपवाद आहे. हा असा भारतीय फलंदाज आहे, ज्याचं बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न झालेलं नाही. तसेच त्याचा संबंध कोणत्याही अभिनेत्रीशी नव्हता. परंतु, त्याचं एका मराठी अभिनेत्रीवर क्रश आहे. ‘Zing Game On’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सुरेश रैनाने आपल्या पहिल्या क्रशचा खुलासा केला आहे. या कार्यक्रमात रैनाने क्रिकेट, संगीत, त्यांचे प्रेम, सेलिब्रिटी क्रश आणि इतरही बऱ्याच विषयावर भाष्य केलं. (वाचा - CSK vs DC IPL 2021: चेन्नईच्या Suresh Raina ने आयपीएल 14 सीजनची केली दणक्यात सुरुवात, 39व्या अर्धशतकाने केले विराट-रोहितची बरोबरी)
मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आपले पहिले क्रश असल्याचा खुलासा यावेळी सुरेश रैनाने केला. इतकेचं नाही तर रैनाने आपल्या कॉलेज जीवनात तिच्याबरोबर डेटवर जाण्याची इच्छा होती, असंही सांगितलं. जेव्हा सोनालीने रैनाला एक खास मेसेज पाठविला होता, तेव्हा तो आनंदाने भारावून गेला होता.
मुलाखतीदरम्यान सुरेश रैनाने आपल्या 4 वर्षाच्या मुलीबद्दलही सांगितले. माझी मुलगी माझा सर्वात मोठा आधार आहे. तिच्या आगमनाने आमचे सर्व आयुष्य बदलले. मी तिच्याबरोबर शेअर केलेले सर्व क्षण मौल्यवान आहेत. पहिल्या दिवसापासून ती माझ्या बाजूने आहे. ती माझी ट्रॅव्हल मैत्रिण आणि माझी आवडती जिम मैत्रिण असल्याचं रैनाने या कार्यक्रमाचे होस्ट करण वाहीला यावेळी सांगितले.
दरम्यान, पुढील महिन्यात सुरेश रैना स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार आहे. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मागील आयपीएलपासून रैनाने कोणत्याही स्पर्धात्मक खेळात सहभाग घेतलेला नाही. ऑगस्टमध्ये रैनाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली होती. आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)