2002 नेटवेस्ट फायनल: इंग्लंडविरुद्ध दिसली टीम इंडियाची 'दादागिरी', 'या' कारणामुळे लॉर्ड्सच्या बाल्कनीत सौरव गांगुलीने हवेत फहरावला होता शर्ट, पाहा Video
2002 मध्ये लंडनमध्ये झालेल्या नेटवेस्ट सिरीजमध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध हा सामना 2 विकेटने जिंकला होता. जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या 'दादागिरी'ची या सामन्यातून सुरू झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. गांगलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नॅटवेस्ट ट्रॉफीचा अंतिम सामना खेळत होता.
इंग्लंडचे ऐतिहासिक ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords) मैदान. भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) नेटवेस्ट मालिकेचा अंतिम (NatWest Series Final) सामना. झहीर खान आणि मोहम्मद कैफ यांनी विजयी धावा पूर्ण केल्यावर प्रेक्षकांनी भरलेल्या त्या स्टेडियममध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) चकित होऊन मैदानावरच बसून राहिला. 2002 मध्ये लंडनमध्ये झालेल्या नेटवेस्ट सिरीजमध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध हा सामना 2 विकेटने जिंकला होता. हा सामना तेव्हा झाला जेव्हा टीम इंडियाने ते केवळ परदेशातच खेळू शकत नाही तर विजय मिळवू शकतो हे सिद्ध केले. जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या 'दादागिरी'ची या सामन्यातून सुरू झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. गांगलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नॅटवेस्ट ट्रॉफीचा अंतिम सामना खेळत होता. या सामन्यात टीम इंडियाला 326 धावांचे लक्ष्य मिळाले. डेरेन गफ, फ्लिंटॉफ आणि एलेक्स टूडर यांसारख्या गोलंदाजांसमोर हे लक्ष्य अशक्य दिसत होते. (सचिन तेंडुलकर कसा बनला ओपनर; अजहरुद्दीनकडे केली होती विनवणी, खूप रोचक आहे मास्टर-ब्लास्टरची सलामी फलंदाज बनण्याची कहाणी)
मात्र, भारतीय सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली आणि भारत हे लक्ष्य गाठेल असे दिसत होते, परंतु सामन्यात वळण आले आणि भारताने 146 धावांवर 5 विकेट गमावल्या. इथून जिंकणे कठीण दिसत होते. त्यानंतरच कैफ आणि युवराज सिंह यांनी अशी भागीदारी रचली जिने क्रिकेटमध्ये इतिहास रचला. दोंघांनी 5 व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून सामनाच बदलून टाकला. 267 च्या धावसंख्येवर युवी बाद झाला. मात्र, कैफ अखेर पर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. युवी बाद झाल्यावर त्याने हरभजन सिंहसोबत मोर्चा सांभाळला. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली, परंतु 48 व्या ओव्हरमध्ये फ्लिंटॉफने हरभजन आणि कुंबळेला बाद केले आणि सामना परत इंग्लंडकडे वळविला.
फायनल आणि मालिका जिंकल्यावर कर्णधार गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून शर्ट फहरावला आणि विजय साजरा केला. तो क्षण अजूनही सर्वांच्या ध्यानी-मनी आहे. पण यामागचे कारण कदाचित सर्वांना माहित नसेल. 2002 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने सामना जिंकला तेव्हा फ्लिंटॉपने टी-शर्ट काढून विजया साजरा केला. गांगुलीने 13 जुलै 2002 रोजी नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फ्लिंटॉफच्या विजयाच्या उत्सवाला प्रत्युत्तर दिले. लॉर्ड्सच्या बाल्कनीतून शर्ट फहरावून गांगुलीने वानखेडेचा बदला घेतला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)