IND vs ENG 4th Test: रांचीत इतिहास रचणार कर्णधार रोहित शर्मा! 'या' खास विक्रमात राहुल द्रविडचा करणार पराभव
त्याचवेळी हा कसोटी सामना रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आठवा विजय ठरला.
IND vs ENG 4th Test: रांची येथील झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणारा भारत-इंग्लंड (IND vs ENG 4th Test) कसोटी सामना कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) खूप महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित शर्माच्या नजरा हा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर असणार आहेत. त्याचबरोबर हा सामना जिंकून तो सध्याच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) एका खास यादीत मागे टाकू शकतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने राजकोट कसोटी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. त्याचवेळी हा कसोटी सामना रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आठवा विजय ठरला. यासह तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत राहुल द्रविडच्या बरोबरीने पोहोचला आहे.
रोहित राहुल द्रविडला मागे टाकेल
द्रविडच्या नावावर 25 कसोटीत 8 विजयांचा विक्रम आहे. आता या यादीत रोहितला राहुल द्रविडला मागे टाकण्याची संधी आहे. रांची कसोटी जिंकून रोहित राहुल द्रविडला मागे टाकेल आणि सुनील गावस्करची बरोबरी करेल. कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी 9 कसोटी जिंकल्या. (हे देखील वाचा: IND vs ENG 4th Test: चौथ्या कसोटीसाठी बीसीसीआयने संघात केले मोठे बदल, तर आकाश दीपला मिळू शकते संधी)
भारतासाठी सर्वाधिक कसोटी जिंकणारे कर्णधार
विराट कोहली 40 विजय
एमएस धोनी 27 विजय
सौरव गांगुली 21 विजयी
मोहम्मद अझरुद्दीन 14 विजयी
सुनील गावस्कर 9 विजयी
रांचीमध्ये टीम इंडियाचा विक्रम
टीम इंडियाने आतापर्यंत रांचीमध्ये दोन कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. टीम इंडियाने मार्च 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांचीमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. दोन्ही संघांमधील हा सामना अनिर्णित राहिला. त्याचवेळी या स्टेडियमवर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव केला.
कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.