टेस्टनंतर आता रविचंद्रन अश्विन याचे Kings XI Punjab संघाचे कर्णधारपदही धोक्यात?, वाचा सविस्तर

भारतीय क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकांच्या संघातून पूर्णपणे काढून टाकलेला भारताचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनवर आता आयपीएलमधूनही बाहेर पडण्याची नामुष्की उभी राहिली आहे. मुंबई मिररच्या अहवालानुसार किंग्ज इलेव्हन पंजाबने अश्विनला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पंजाब अश्विनला दुसर्‍या फ्रँचायझीमध्ये ट्रेड करण्याबाबत चर्चा करीत आहे.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: AP/PTI)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध अँटिगातील पहिल्या टेस्ट सामन्यात प्लेयिंग इलेव्हनमध्ये आर अश्विन (R Ashwin) याची अनुपस्थिती ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेचा मुद्दा आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकांच्या संघातून पूर्णपणे काढून टाकलेला भारताचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनवर आता आयपीएल (IPL) मधूनही बाहेर पडण्याची नामुष्की उभी राहिली आहे. सध्या भारतीय संघात सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले गेलेले अश्विनची किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) च्या कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊ शकते. अश्विनला आयपीएल 2018 च्या लिलावात 7.6 कोटींची भरपाई देऊन किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्या संघाचा सदस्य बनविले होते. पंजाबने त्याला केवळ एवढी मोठी रक्कमच दिली तर त्याला संघाची कमानही दिली होती. (IND vs WI 1st Test Day 1: रविचंद्रन अश्विन याला Playing XI मधून वगळल्याने भडकले नेटिझन्स, म्हणाले ही सर्वात 'विचित्र निवड')

मागील दोन वर्षांत पंजाबची कामगिरी सुधारली असली तरी संघ दोन्ही मोसमात दरवर्षीप्रमाणेच पहिल्या-4 मध्ये स्थान मिळविण्यास अपयशी ठरला. शिवाय अश्विनचे काही निर्णयही न समजण्यासारखे होते. मुंबई मिररच्या अहवालानुसार किंग्ज इलेव्हन पंजाबने अश्विनला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पंजाब अश्विनला दुसर्‍या फ्रँचायझीमध्ये ट्रेड करण्याबाबत चर्चा करीत आहे. अश्विनला राजस्थान रॉयल्स किंवा दिल्ली कॅपिटलमध्ये ट्रेड करण्याचे समजले जात आहे. अशा परिस्थितीत अश्विनला राजस्थान रॉयल्सच्या कृष्णाप्पा गौतमसोबत ट्रेड केले जाऊ शकते.

दरम्यान, मागील वर्षी अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर याला मंकड पद्धतीने बाद करण्याने चर्चेत आला होता. अश्विनने नॉटस्ट्राइकिंग एंडवर उभा असलेल्या बटलरला धावचीत केले. बटलर क्रीजच्या बाहेर उभा होता. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now