IND vs PAK World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी अहमदाबादला छावणी, सात हजार पोलिस आणि चार हजार होमगार्ड तैनात
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहोचणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 1.30 लाख प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादला (Ahmedabad) पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहोचणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 1.30 लाख प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. अशा परिस्थितीत 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये चाहत्यांचा मेळावा होणार आहे. यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी, पाकिस्तानविरोधात शुभमन गिल उतरणार मैदानात? सरावाला केली सुरुवात)
संपूर्ण अहमदाबादमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषतः स्टेडियमजवळील सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, स्टेडियम आणि शहरातील विशिष्ट भागांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांचे 11 हजाराहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी काउंटर टेरर फोर्स, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, रॅपिड अॅक्शन फोर्स, होमगार्ड आणि गुजरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
या सामन्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये सात हजारांहून अधिक पोलीस आणि चार हजार होमगार्ड जवान तैनात असतील. नॅशनल सिक्युरिटी गार्डची तीन टीम आणि ड्रोनविरोधी टीमही घटनास्थळी असेल. स्टेडियमजवळचा परिसर आधीच ड्रोनविरोधी झोन घोषित करण्यात आला आहे. सामन्यादरम्यान शहर आणि स्टेडियमच्या सुरक्षेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि सुरक्षेशी संबंधित तयारीचा आढावाही घेतला.
अहमदाबाद पोलिसांना ईमेलद्वारे नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. 500 कोटी रुपये द्यावेत आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची सुटका करावी, असेही या मेलमध्ये म्हटले होते. या मेलनंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून गुजरात पोलिसांव्यतिरिक्त इतर सुरक्षा यंत्रणांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षेचा विचार करून कोणत्याही चाहत्याला वादग्रस्त बॅनर लावता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही अफवा पसरू नये म्हणून सोशल मीडियावरही पूर्ण नजर ठेवली जात आहे. अहमदाबादमधील संवेदनशील भागातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल.
एकदिवसीय विश्वचषकासाठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)