Women’s Ashes 2023: द्विशतक ठोकून 'या' महिला खेळाडूने इतिहास रचला, 88 वर्षे जुना विक्रम मोडला
टॅमी ब्युमॉन्टच्या आधी 1935 मध्ये स्नोबॉलने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 189 धावांची खेळी केली होती.
अॅशेस मालिकेतील एकमेव कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये (Eng vs Aus Women’s Ashes 2023) खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडची सलामीवीर टॅमी ब्युमॉन्टने (Tammy Beaumont) 208 धावांची खेळी खेळून इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी टॅमी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. टॅमी ब्युमॉन्टच्या आधी 1935 मध्ये स्नोबॉलने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 189 धावांची खेळी केली होती. आता टॅमी ब्युमॉंटने 88 वर्षांनंतर इंग्लंडकडून कसोटीतील सर्वात मोठी खेळी खेळून हा स्नोबॉल रेकॉर्ड मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध, टॅमी ब्युमॉन्टने 331 चेंडूत 208 धावा केल्या, त्यादरम्यान तिच्या बॅटमधून 27 चौकार आले.
कसोटीत द्विशतक झळकावणारी ठरली आठवी महिला क्रिकेटपटू
कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी टॅमी ब्लूमॉन्ट ही पहिली इंग्लिश महिला क्रिकेटपटू ठरली आहे. त्याचबरोबर कसोटीत अशी कामगिरी करणारी ती आठवी महिला खेळाडू ठरली आहे. (हे देखील वाचा: Zimbabwe Beat West Indies: झिम्बाब्वेकडून पराभवानंतर वेस्ट इंडिजच्या अडचणीत वाढ, एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगणार)
सामन्याची स्थिती
खरे तर महिलांच्या अॅशेस मालिकेतील एकमेव कसोटी सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 473 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 463 धावा केल्या होत्या. आता ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 82 धावा केल्या आणि 92 धावांची आघाडी घेतली.