IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: बुमराहचा पंजा, इंग्लंडचा संघ 465 धावांवर सर्वबाद, भारताकडे 6 धावांची आघाडी

दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या होत्या. आता, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ 465 धावांवर सर्वबाद झाला आहे. त्यामुळे भारताने 6 धावांची आघाडी घेतली. आहे. त्याआधी भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या.

IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: बुमराहचा पंजा, इंग्लंडचा संघ 465 धावांवर सर्वबाद, भारताकडे 6 धावांची आघाडी
Team India (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शनिवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या होत्या. आता, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ 465 धावांवर सर्वबाद झाला आहे. त्यामुळे भारताने 6 धावांची आघाडी घेतली. आहे. त्याआधी भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: बुमराहचा पंजा, इंग्लंडचा संघ 465 धावांवर सर्वबाद, भारताकडे 6 धावांची आघाडी)

जयस्वाल, गिल आणि पंतचे दमदार शतक

सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. भारताकडून यशस्वी जयस्वाल (101), कर्णधार शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंतने (134) धावा केल्या. तर केएल राहुलने 42 धावांचे योगदान दिले. गिल आणि पंतने मिळून 209 धावांची मोठी भागीदारी रचली. बाकी कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर जोश टंग आणि शोएब बशीर यांनी 1-1 विकेट मिळाली.

जसप्रीत बुमराहने घेतल्या पाच विकेट्स

त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडचा संघाने 10 विकेट गमावून 465 धावा केल्या. इंग्लंडची सुरुवात काही खास झाली नाही. झॅक क्रॉली 4 धावा करुन बुमराहाचा बळी ठरला. पुढे पोप आणि डकेटने 122 धावांची भागीदारी रचली. इंगलंडकडून ऑली पोपने 106 धावा केल्या तर हॅरी ब्रूक 99 बाद झाला. जेमी स्मिथ 40 आणि ख्रिस वोक्स 38 धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने तीन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाने इंग्लंडला 465 धावांवर रोखले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 08:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).