ऑलिम्पिक पदकविजेतांचा सन्मान, शालेय मुलांना मोफत Pass; भारताची पहिली डे/नाईट टेस्ट अविस्मरणीय करण्यासाठी BCCI सज्ज
भारत आणि बांग्लादेश संघ पहिला डे-नाईट टेस्ट सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळणार आहे. या ऐतिहासिक क्षणाला खेळाडू आणि चाहत्यांसाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी बीसीसीआय आणि सीएबी सर्वपरीने प्रयत्न करत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) भारत आणि बांगलादेश यांच्यात 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्याच्या वेळी भारतीय ऑलिम्पिक पदकविजेते अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra), एमसी मेरी कॉम (MC Mary Kom) आणि पीव्ही सिंधू (PV Sindhu) यांचा सन्मान करण्याचा विचार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) सूत्रांच्या माहितीनुसार बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान बिंद्रा, मेरी कोम आणि सिंधू यासारख्या दिग्गज ऑलिम्पिक पदकविजेतांना आमंत्रित करण्याची योजना आखली जात आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत बिंद्रा भारताची एकमेव सुवर्णपदक विजेता आहे तर सिंधू ही भारताची पहिली जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आहे. भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघ कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर डे-नाईट टेस्ट सामना खेळणार आहे. दोन्ही संघासाठी हा पहिला डे-नाईट टेस्ट सामना असणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ पिंक बॉल टेस्ट खेळण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात होते. आणि आता या ऐतिहासिक क्षणाला खेळाडू आणि चाहत्यांसाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी बीसीसीआय आणि सीएबी सर्वपरीने प्रयत्न करत आहे. (टीम इंडियाच्या पहिल्या Day/Night टेस्टला मंजुरी मिळाल्यांनतर सौरव गांगुली याने मानले विराट कोहली चे आभार, जाणून घ्या काय आहे कारण)
ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सन्मान करण्याव्यतिरिक्त सीएबीची शालेय मुलांना देखील आमंत्रित करण्याची योजना आहे. या मुलांना विनामूल्य पास दिले जातील. बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडे (सीएबी) डे-नाईट टेस्ट खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. आणि मंगळवारी सीएबीने तो मांजर केल्याची माहिती गांगुलीने दिली. बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गांगुलीने कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर डे-नाईट कसोटी खेळण्याबाबत बोलणी केली होती. यावर कोहलीने आपण त्याच्या पक्षात आहोत असे सांगितले.
बांग्लादेश संघ बुधवारी भारतात पोहोचत आहे. बांग्ला टायगर्सला भारतासह तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याआधी बांग्लादेशला मोठा धक्काच बसला आहे. त्यांचा कर्णधार शाकिब अल हसन याच्यावर दोन वर्षाची बंदी घातली आहे. शाकिबकडे एका बुकीने मॅच फ़िक्सिन्गसाठी संपर्क साधला होता, मात्र शाकिबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) याची माहिती दिली नाही. यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याच्यानंतर, बीसीबीने महमूदुल्लाह (Mahmudullah) याला टी-20 आणि मोमीनुल हक (Mominul Haque) याच्याकडे टेस्ट संघाची जबाबदारी दिली आहे.