BCCI ने शेअर केला विराट कोहली याचा सिंघम स्टाईल फोटो, सोशल मीडिया यूजर्सनी शेअर केल्या हटके Memes, पहा Tweets

बीसीसीआयने विराटचा सिंघम अवतार मधील फोटो शेअर केला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील विराटची रिअक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटच्या या मजेदार प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर मेम फेस्टला सुरुवात झाली.

विराट कोहली (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी अधिकही फेल होत नाही. भारतीय कर्णधार त्याच्या फलंदाजीनेच नाही तर त्याच्या मैदानावरील हावभावानेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. विराट, सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध टेस्ट मालिका खेळत आहे. आफ्रिका संघाविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये विराटने रेकॉर्ड 7 वे टेस्टमधील दुहेरी शतक करत अनेक रेकॉर्डना गवसणी घातली होती. तर, आता तो आफ्रिकाविरुद्ध क्लीन-स्वीप करण्यासाठी संघाचे नेतृत्व करत आहे. यादरम्यान, भारतीय क्रिकेट मंडळ, बीसीसीआयने विराटचा सिंघम अवतार मधील फोटो शेअर केला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील विराटची रिअक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि या फोटोला पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल यात शंका नाही.  (IND vs SA 3rd Test: सलग दोन षटकार मारत उमेश यादव झाला सचिन तेंडुलकरच्या 'या' एलिट यादीत सामील, टेस्टमध्ये केली सर्वाधिक स्ट्राईक रेटची नोंद)

बीसीसीआयने विराटचा दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या मॅचमधील एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना त्याला कॅप्शन देण्यास सांगितले. सोशल मीडिया यूजर्सने ही संधी सोडली नाही आणि भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विराटच्या या मजेदार प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर मेम फेस्टला सुरुवात झाली. आणि बहुतांश लोकांनी 'गली बॉय' चित्रपटाच्या रॅप गाण्याशी त्याच्या शरीराच्या जेस्चर संबंधित प्रतिक्रीय दिल्या. पहा हा फोटो:

काहींनी तर तर विराट 'भूत' असल्याचंही उल्लेख केला. पहा सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया:

शेर आया शेर आया

'आबरा का डाबरा, विराट कोहली प्रोटियासवर जादू चालवत आहे

अतिथी गेल्यानंतर:

बर्‍याच भांडी पाहून, माझी प्रतिक्रिया

हे पाहिल्यानंतर

लपवा-छापावी खेळताना 

पाळा, वाचवा सिंह आला

विराटच्या सध्याच्या खेळाबद्दल बोलले तर, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कोहली या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 12 धावाच करू शकला. पण, नंतर पुणेमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद 254 धावा ठोकत दमदार द्विशक केले. तर, यापूर्वी पहिल्या विशाखापट्टणम मॅचमध्ये त्याने 20 आणि 31 धावांची खेळी केली होती.