BAN vs AUS 2021: क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटवर बांगलादेशच्या विजयी उत्सवाचा व्हिडिओ पाहून जस्टीन लँगर संतापले; पाहा मग काय झाले

या व्हिडिओमध्ये बांगलादेशचे खेळाडू गेल्या आठवड्यात कांगारू संघाविरुद्ध त्यांच्या पहिल्या मालिका विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.

जस्टिन लँगर (Photo Credit: Twitter)

BAN vs AUS 2021: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे (Australia Cricket Team) मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यांचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Cricket Australia) कर्मचाऱ्याशी बोर्डाच्या वेबसाइटवर कथितपणे पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून वाद झाला. या व्हिडिओमध्ये बांगलादेशचे खेळाडू गेल्या आठवड्यात कांगारू संघाविरुद्ध त्यांच्या पहिल्या मालिका विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. ‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ नुसार, Cricket.com.au वेबसाइटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून मालिकेच्या तिसऱ्या सामन्यानंतर लँगर आणि ऑस्ट्रेलिया संघाचे व्यवस्थापक गेविन डोवे (Gavin Dovey) यांच्यात वाद झाला. यजमान बांगलादेशने पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकली. अहवालानुसार, डोवेने सुरुवातीला हे प्रकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या डिजिटल कर्मचाऱ्यांकडे नेले, पण जेव्हा ते सहमत झाले नाही, तेव्हा हे प्रकरण वाढले आणि लॅंगर स्टाफ मेंबरवर संतापले. (BAN vs AUS 2021: ऑस्ट्रेलियाच्या Nathan Ellis याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार एंट्री, बांगलादेशविरुद्ध टी-20 पदार्पणात घेतली हॅट्रिक)

“डोवेने असा युक्तिवाद केला होता की सीए संचालित वेबसाइटवर बांगलादेश संघाचे गाणे पोस्ट करणे अयोग्य आहे.” लँगरने या विषयावर भाष्य करणे टाळले, तर डोवे म्हणाले: “निरोगी सांघिक वातावरणात प्रामाणिक आणि स्पष्ट चर्चा करण्याची क्षमता समाविष्ट असते, मग ते खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा सांघिक वातावरणातील इतर लोकांमध्ये असो, जे इथे होते. मतभेद होते आणि आम्ही एका विशिष्ट विषयावर असहमत होण्यास सहमत झालो. हे त्या घटनांपैकी एक होते जे खाजगीत घडले पाहिजे. मी त्याची पूर्ण जबाबदारी घेतो.” दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर बाद झाला आणि बांगलादेशने 60 धावांनी पराभूत करून आणखी एक संस्मरणीय मोहिमेची नोंद केली.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने आता सलग पाच टी-20 मालिका गमावल्या आहेत आणि 21 पैकी फक्त सहा जिंकल्या आहेत. यापूर्वी विंडीज दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका 1-4 ने गमावली होती. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कांगारू संघासाठी ही डोक्याची घंटा सिद्ध होऊ शकते. तसेच नियमित कर्णधार आरोन फिंच देखील दुखापतग्रस्त असल्यामुळे आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.