ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचे करिअर धोक्यात; क्रिकेट खेळताना फुफ्फुसतून वाहते रक्त

रक्तस्त्राव होण्याचे नेमके कारण काय याबाबत त्याच्या डॉक्टरांनाही समजू शकले नाही.

जॉन हेस्टिंग (Photo Credits: twitter)

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन हेस्टिंग याचे करिअरच धोक्यात आले आहे. फुप्फुच्या आजारामुळे जॉन हेस्टिंग सध्या त्रस्त आहे. या त्रासामुळेच सध्या तो अनिश्चित काळासाठी मैदानाबाहेर आहे. ईएसपीएनक्रिकइंफो या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, हेस्टींग गोलंदाजीसाठी मैदानावर धावू लागतो तेव्हा, त्याच्या फुफ्फुसातून रक्तस्त्राव होऊ लागतो. रक्तस्त्राव होण्याचे नेमके कारण काय याबाबत त्याच्या डॉक्टरांनाही समजू शकले नाही.

ऑस्ट्रेलियाचे रेडिओ स्टेशन आरएसएनशी बोलताना हेस्टिंगने सांगितले की, माझ्यासाठी गेले तीन-चार महिन्यांचा कालावधी प्रचंड दुख:दायक राहिला आहे. मी जेव्हाही गोलंदाजीसाठी तयार होतो तेव्हा माझ्या छातीतून आणि काखांच्या खालून रक्त यायला सुरुवात होते. हेस्टींगने टेस्ट आणि वनडे सामन्यातून आगोदरच निवृत्ती घेतली आहे. सध्या तो टी-२० मध्ये खेळतो.

पुढे बोलताना हेस्टींगने म्हटले आहे की, यावर्षी मी गोलंदाजी करु शकणार नाही. माझ्यासाठी हा अत्यंत वाईट काळ आहे. सध्यास्थितीत मी काहीसा सावरलो आहे. मी आजवरचे संपूर्ण आयुष्य क्रिकेट खेळत आलो आहे. यापुढेही खेळण्याची इच्छा आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Rohit Sharma Set to Join Indian Team: पर्थ कसोटीपूर्वी भारतासाठी मोठी बातमी, रोहित शर्मा 'या' दिवशी संघात होणार सामील- रिपोर्ट

Jasprit Bumrah VS Pat Cummins: जसप्रीत बुमराह विरुद्ध पॅट कमिन्स, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कोण सरस? वाचा आकडेवारी

IND vs AUS 1st Test Head to Head: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची कसोटीत कशी आहे आकडेवारी? कोणाचे आहे वर्चस्व? जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड

IND vs AUS 1st Test 2024 Live Streaming: भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना? कोणत्या ओटीटी आणि टीव्ही चॅनलवर पाहणार लाइव्ह? घ्या जाणून