IND Vs AUS 2nd T20I 2020: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली याने लगावलेला षटकार पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; पाहा व्हिडिओ
पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 11 धावांनी विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभूत केले. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने यशस्वी मात केली.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात टी-20 मालिका जिंकण्याचा कारणामा केला आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 11 धावांनी विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभूत केले. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने यशस्वी मात केली. या सामन्यात विराट कोहलीने लगावलेल्या षटकाराने सर्वांनी लक्ष वेधून घेतले आहे. विराट कोहलीला असा षटकार लगावताना याआधी कधीही पाहिले नसेल. विराटने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
भारतीय संघ फलंदाजी करताना 15 व्या षटकाच्या चौथ्या बॉलवर विराट कोहलीने अँड्रयू टायच्या गोलंदाजीवर शॉर्ट फाइन लेगला अफलातून षटकार मारला आहे. आपल्या नैसर्गिक स्वभावाविरुद्ध त्याने खेळलेला हा स्कूपचा फटका पाहून समालोचकांसह सगळेच अचंबित झाले. हा फटका पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सशी केली आहे. हे देखील वाचा- IND vs AUS 2nd T20I: युजवेंद्र चहलची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जसप्रीत बुमराहची बरोबरी करत भारताचा बनला नंबर 1 गोलंदाज
ट्विट-
3 सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताला 2-1 पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने टी 20 मालिका आपल्या नावावर केली आहे. भारताचा टी-20 मधील सलग दहावा विजय आहे. दरम्यान, यासह भारतीय संघाने आणखी एक विक्रमी कामगिरी केली आहे. याशिवाय, भारतीय संघाने टी-20 मध्ये सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे.