AUS vs PAK Semi-Final, T20 World Cup 2021: ICU मधून मैदानात पोहोचला Mohammad Rizwan, सेमीफायनल पूर्वी दोन दिवस रुग्णालयात होता भर्ती
सेमीफायनलमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक 67 धावांची विस्फोटक खेळी करणाऱ्या मोहम्मद रिझवानचा धक्कादायक फोटो समोर आला आहे. उपांत्य फेरीपूर्वी रिझवानला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात कांगारू संघाने बाजी मारली आणि दुसऱ्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली. ग्रुप स्टेजमधील सर्व पाच सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचलेली पाकिस्तान क्रिकेट टीम (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन स्पर्धे बाहेर पडली. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक 67 धावांची विस्फोटक खेळी करणाऱ्या मोहम्मद रिझवानचा (Mohammad Rizwan) धक्कादायक फोटो समोर आला आहे. उपांत्य फेरीपूर्वी रिझवानला ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा पहिलाच पराभव होता आणि या पराभवामुळे त्यांचा टी-20 विश्वचषक स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. पाकिस्तान संघाने संपूर्ण स्पर्धेत आपल्या उत्कटतेने आणि खिलाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली. पण एक खेळाडू असा होता की ज्याच्या मनोवृत्तीचे आणि धैर्याचे सर्वाधिक कौतुक केले जात आहे. तो संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आहे. (T20 World Cup 2021: अंपायरच्या चुकीमुळेही पाकिस्तानला अंतिम फेरी गाठता आली नाही, ऑस्ट्रेलियन फलंदाजानेही केली मोठी घोडचूक)
या सामन्यापूर्वी लोकांना माहित नव्हते की रिझवानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंतर त्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर रिझवानचा फोटो शेअर केला जो त्वरित व्हायरल झाला. तेव्हा कळलं की सेमीफायनलच्या आधी हा यष्टिरक्षक फलंदाज खूप आजारी होता. पाकिस्तानचे फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन यांनीच उपांत्य फेरीदरम्यान खुलासा केला होता की सामन्याच्या 24 तासपूर्वी रिझवान फुफ्फुसाच्या संसर्गामुळे आयसीयूमध्ये होता. पण उपांत्य फेरीत प्रवेश करत त्याने शानदार अर्धशतक झळकावले. यावरून तोच खरा योद्धा असल्याचे दिसून येते. त्याच्यात विलक्षण धैर्य आहे. रिझवानला छातीत संसर्ग झाला होता आणि त्याने दोन रात्री आयसीयूमध्ये घालवल्या असून गुरुवारच्या उपांत्य फेरीच्या दिवशीच त्याला डिस्चार्ज करण्यात आले होते.
पाकिस्तानच्या टीमचे डॉक्टर नजीबुल्लाह सूमरो यांनी सांगितले की, “मोहम्मद रिझवानला 9 नोव्हेंबर रोजी छातीत गंभीर संसर्ग झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याने दोन रात्र ICU मध्ये काढल्या. त्याने अविश्वसनीय पुनर्प्राप्ती केली आणि सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त झाला. देशासाठी कामगिरी करण्याची त्याची भावना दर्शविणारी त्याची जिद्द आणि दृढता आपण पाहू शकतो. आणि आज त्याने कशी कामगिरी केली ते आपण पाहू शकतो.” रिजवानसोबत 77 धावांची सलामी भागीदारी करणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानेही त्याच्या निर्धाराचे कौतुक केले. बाबर म्हणाला, “नक्कीच तो टीम मॅन आहे.”