AUS vs NZ 1st Test: मार्नस लाबुशेन याने मोडला विराट कोहली चा रेकॉर्ड, न्यूझीलंडविरुद्ध पर्थ टेस्टमध्ये नोंदवल्या सर्वाधिक धावा, वाचा सविस्तर
लाबुशेनची 143 धावांची ही खेळी या मैदानावरील एका वैयक्तिक खेळाडूची सर्वाधिक धावांची खेळी आहे. यासाठी त्याने भारतीय कर्णधार विराट कोहली याला पिछाडीवर टाकले. विराटने मागील वर्षी या मैदानावर सर्वाधिक 123 धावांचा प्रभावी खेळ केला होता.
ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात ऑप्टस स्टेडियम (Optus Stadium) मध्ये 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टेस्ट सामना खेळला जात आहे. कांगारू संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने पुन्हा एकदा योग्यता सिद्ध करत शतकी डाव खेळला आणि संघाला मजबूत स्थतीतीत नेले. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी लाबुशेने 240 चेंडूत 143 धावांची खेळी केली. लाबुशेनचे हे सलग तिसरे टेस्ट शतक आहे. लाबुशेन सध्या त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी डेविड वॉर्नर 43 आणि जो बर्न्स 9 धावांवर आऊट झाल्यावर लाबुशेनने स्टिव्ह स्मिथ याच्यासाथीने डाव सावरला. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दिवशी 110 धावा करणाऱ्यालाबुशेनने दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला 33 धावांची भर घालत 143 धावा केल्या आणि नील वॅग्नर याच्या चेंडूवर बाद झाला. (AUS vs NZ 1st Test: मार्नस लाबुशेन याने कसोटी सामन्यात लगावले सलग तिसरे शतक, डॉन ब्रॅडमन यांच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील)
लाबुशेनची 143 धावांची ही खेळी या मैदानावरील एका वैयक्तिक खेळाडूची सर्वाधिक धावांची खेळी आहे. यासाठी त्याने भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला पिछाडीवर टाकले. विराटने मागील वर्षी या मैदानावर सर्वाधिक 123 धावांचा प्रभावी खेळ केला होता. 150 धावांचीलाबुशेनला फक्त 7 धावा कमी पडल्या. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत लाबुशेनने सलग दोन शतकं केली होती आणि हे त्याचे सलग तिसरे शतक आहे. लाबुशेनच्या कारकिर्दीतील 12 कसोटीतील हे त्याचे तिसरे शतक आहे आणि त्याने कसोटी सामन्यात 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत.
सध्या ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 363 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली, पण नंतर फलंदाज किवी गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी दिसले. स्मिथ देखील स्वस्तात बाद झाला. त्याने 43 धावा केल्या आणि नील वॅग्नरचा दुसरा शिकार बनला. स्मिथनंतर मॅथ्यू वेड हाही लवकर बाद झाला आणि वेडने 12 धावा केल्या. यानंतर ट्रॅव्हिस हेड यानेलाबुशेनला चांगली साठी दिली आणि 56 धावा केल्या.