Ashes 2019: मॅनचेस्टर टेस्टआधी स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध
आगामी चौथी टेस्ट दोन्ही संघासाठी महत्वाची असणार आहे. पण, या सामन्याआधी स्मिथ आणि आर्चर यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले.
इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील अॅशेस (Ashes) मालिकेच्या दुसर्या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याच्या बाऊन्सर बॉलवर कांगारूंचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) जखमी झाला.आर्चरचा बाउन्सर स्मिथच्या मानेला लागला आणि तो मैदानातच कोसळला. या अपघातामुळे स्मिथला हेडींगले येथील तिसऱ्या कसोटी साम न्याला मुकावे लागले होते. पण, आता स्मिथ मॅनचेस्टर (Manchester) येथे होणाऱ्या चौथ्या टेस्टमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. तिसऱ्या टेस्टदरम्यान, स्मिथला नेट्समध्ये सराव करताना देखील पहिले गेले होते. आगामी चौथी टेस्ट दोन्ही संघासाठी महत्वाची असणार आहे. पण, या सामन्याआधी स्मिथ आणि आर्चर यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. (Ashes 2019: जॅक लीच याच्या एका धावेवर Specsavers खुश, आयुष्यभर पुरवणार 'ही' खास गिफ्ट)
चौथ्या कसोटीपूर्वी स्मिथ म्हणाला, "लोक असे म्हणत आहेत की आर्चर माझ्यावर भारी पडला पण तो मला आऊट करू शकला नाही." स्मिथच्या या वक्तव्यावर आर्चरनेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आर्चर म्हणाला, "बरं, क्रीजवर नसल्यास मी त्याला आऊट करू शकत नाही. लॉर्ड्समध्ये मला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करायची होती, पण मी गोलंदाजी करण्यापूर्वी तो बाद झाला. परंतु त्याला आऊट करण्यासाठी मला आणखी बर्याच संधी मिळतील."
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथ 80 धावांवर खेळत होता, जेव्हा त्याला बाउन्सर बॉल लागला. यानंतर त्याला मैदान सोडून जावे लागले. पण, तो पुन्हा फलंदाजीसाठी आला आणि यावेळी त्याला क्रिस वोक्स याने 92 धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. तर, दुसऱ्या डावात स्मिथऐवजी मार्नस लाबुशने पर्याय म्हणून फलंदाजी करायला आला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला तर लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेला दुसरा सामान ड्रॉ झाला. पण, तिसऱ्या आणि महत्वपूर्ण सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन केले आणि सामना 1-1 च्या बरोबरीत आणला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने प्रभावी भूमिका बजावली. स्टोक्सने नाबाद 135 धावांची खेळी करत संघाला १ विकेटने विजय मिळवून दिला.