Ashes 2019: हेडिंगले टेस्टसाठी इंग्लंड संघ जाहीर; ऑस्ट्रेलियासाठी स्टिव्ह स्मिथ याची दुखापत डोकेदुखी, वाचा सविस्तर

हेडिंगले येथे खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या संघात एकही नाही. टेस्ट पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात तुफान कामगिरी करणारा जोफ्रा आर्चरचे स्थान कायम आहे.

इंग्लंड संघ (Photo Credit: AP/PTI)

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध तिसऱ्या अ‍ॅशेस (Ashes) टेस्ट सामन्यासाठी इंग्लंड (England) संघ जाहीर करण्यात आला आहे. हेडिंगले (Headingley) येथे खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या संघात एकही नाही. यजमानांचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याला पुन्हा वगळण्यात आले आहे. तर टेस्ट पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात तुफान कामगिरी करणारा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचे स्थान कायम आहे. एजबॅस्टन येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टेस्टमध्ये माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून घेतली. पण, लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावरील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुनरागमन केले आणि सामान ड्रॉ केला. दुसरा सामन्यात पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्याने सामना दुसऱ्या दिवशी सुरु झाला. यात आर्चरने टेस्टमध्ये पदार्पण केले. आर्चरच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मुश्किलीत पडले. (स्टिव्ह स्मिथ याच्याशिवाय या 5 क्रिकेटपटूंसाठी जोफ्रा आर्चर बनला कर्दनकाळ; 'हा' भारतीय देखील बनला होता शिकार, वाचा सविस्तर)

दरम्यान, याच सामन्यात स्मिथला आर्चरच्या चेंडूवर दुखापत झाली. त्याची दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही. आर्चरने 148.7 ताशी प्रति कि.मी. या वेगाने बाऊन्स टाकला. हा बाऊन्सर स्मिथच्या मानेला लागला. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलिया स्मिथच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करत आहे. स्मिथची दुखापत गंभीर असल्यास त्याला तिसऱ्या संन्यास मुकायला लागण्याची शक्यता आहे. आणि असे झाल्यास ऑस्ट्रेलियासाठी ही मोठी चिंतेची बाब असेल. यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत तीन डावांमध्ये स्मिथने सर्वाधिक धावा केल्या आहेत. स्मिथ ऑस्ट्रेलियाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. जर स्मिथ आगामी सामना खेळण्यास उपलब्ध नसेल तर संघात त्याची जागा भरून काढणे कोणत्याही खेळाडूसाठी मुश्किल असेल.

असा आहे इंग्लंडचा संघ: जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो डेन्ली, बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि सॅम कुर्रान.