India vs England Series: टी-20 विश्वचषक विजेता 'हा' खेळडू इंग्लंड मालिकेत कसोटी पदार्पणासाठी सज्ज: अहवाल

अर्शदीप सिंगला इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपला संभाव्य कसोटी पदार्पणासाठी सज्ज असल्याचे कळवले आहे.

Arshdeep Singh (Photo Credit - X)

Arshdeep Singh Test Debut in India vs England Series: टीम इंडिया 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध (India vs England) खेळण्यास सज्ज आहे. 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मोहिमेची ही सुरुवात असेल. ही मालिका भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन भारतासाठीचे अत्यंत महत्वाचे खेळाडू संघाचा भाग नसणार आहेत. रोहीत-विराट यांच्या निवृत्तीनंतर ही पहिलीच भारताची पहिली कसोटी मालीका आहे. या मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक तरुण खेळाडूंना आवाहन केले जात आहे.

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, अर्शदीप सिंग इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यास सज्ज आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अर्शदीप सिंगला संभाव्य कसोटी पदार्पणासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची त्याची क्षमता यामुळेच त्याला संघात निवडण्यात येत आहे. India England Tour 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची 'या' दिवशी होणार घोषणा, नवीन कसोटी कर्णधाराबद्दलही आले अपडेट

शुभमन गिल, ऋषभ पंत कसोटी कर्णधारच्या शर्यतीत

रोहित शर्माच्या जागी नवीन कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्याकडे पाहिल जात आहे. कारण, जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाचही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाहीये. त्यामुळे तो कर्णधार शर्यतीतून बाहेर पडला आहे. तरीही ऋषभ पंतकेड कर्णधार आणि शुभमनकेड उपकर्णधार म्हणून पाहिले जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement