क्रिकेटर अनिल कुंबळेने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने लॉन्च केली पॉवर बॅट
मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत अनिल कुंबळेच्या स्पेक्टाकॉम टेक्नॉलॉजीच्या स्टार्टअपने ब्रॉडकॉस्ट पार्टनर स्टार इंडीयाच्या सोबतीने खास बॅट आणली आहे.
बदलत्या टेक्नोलॉजीचा क्रिकेट विश्वावरही परिणाम होत आहे. जसजसा काळ पुढे जातोय तसं क्रिकेट विश्वही बदलतं आहे. नुकतेच क्रिकेटर अनिल कुंबळेने एक पॉवर बॅट लॉन्च केली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत अनिल कुंबळेच्या स्पेक्टाकॉम टेक्नॉलॉजीच्या स्टार्टअपने ब्रॉडकॉस्ट पार्टनर स्टार इंडीयाच्या सोबतीने खास बॅट आणली आहे. गुरूवारी या पॉवर बॅटची घोषणा करण्यात आली आहे.
काय आहे Power Bat चं वैशिष्ट्य ?
आर्टिफिशिएल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्जच्या मदतीने पॉवर बॅट काम करते.
पॉवर बॅटवर एक खास स्टिकर लावण्यात आलं आहे. त्यांच्यामध्ये साठवली जाणारी माहिती स्क्रिनवर पाहता येणार आहे.
पॉवर स्पॅक या खास एकेकामध्ये सार्या गोष्टींची नोंद होणार आहे. तसेच ही माहिती सुरक्षितरित्या साठवलीही जाणार आहे.
बॉल किती वेगात टोलावला गेला, बॅट कशी फिरली, त्याचा परिणाम काय झाला, कोणता शॉट होता? अशा प्रत्येक चेंडूची माहिती रेकॉर्ड होणार आहे.
पॉवर बॅटमुळे खेळाडूंना आपल्या काय चूका झाल्या? हे समजणं अधिक सुकर होणार आहे. तसेच या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून खेळ सुधारण्यासही मदत होईल.