Akash Chopra On Team India: आकाश चोप्राने भारताच्या फलंदाजी क्रमावर उठवले प्रश्न, म्हणाला- 'विश्वचषकात फायदा होणार नाही'
ज्यामध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. इशान किशनने (Ishan Kishan) तिथे सलामी दिली.
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाहुण्या संघाने शानदार कामगिरी करत 5 विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात 114 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमात बरेच बदल झाले. ज्यामध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. इशान किशनने (Ishan Kishan) तिथे सलामी दिली. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटूने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. आकाश चोप्राचा विश्वास आहे की इशान किशनच्या शीर्ष फळीतील अर्धशतकामुळे भारताला 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज मिळण्यासाठी मदत झाली नाही. सामन्यात, किशनने 46 चेंडूत 52 धावा केल्या, रोहित शर्मा अँड कंपनीने 114 धावांचे लक्ष्य पाच गडी राखून आणि 27.1 षटके बाकी असताना पूर्ण केले.
आपल्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये चोप्रा म्हणाले की, किशनच्या अर्धशतकाने केएल राहुलनंतर भारताचा दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संजू सॅमसनला मागे टाकण्यास मदत केली नाही. त्याच्या मते, जर किशनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर तो विश्वचषकात स्थानासाठी ऑडिशन देऊ शकला असता. मात्र त्याला तशी संधी देण्यात आली नाही. (हे देखील वाचा: Kuldeep Yadav च्या हेअरस्टाईलचे Ravindra Jadeja ने केले कौतुक तर Virat Kohli ने घेतलेला झेल अप्रतिम, BCCI ने मजेदार व्हिडिओ केला शेअर)
आकाश चोप्रा म्हणाला की, “इशान किशनला चौथ्या क्रमांकावर ठेवण्यात आले होते, त्यामुळे तुम्ही समजू शकता की हा संघ त्याच्याकडे दुसरा यष्टीरक्षक म्हणून पाहत आहे जो मधल्या फळीत फलंदाजी करेल, याचा खूप अर्थ आहे. मात्र, तुम्ही त्याला सलामी दिली आणि त्याने अर्धशतक झळकावले. तो ते करू शकतो. त्याने वनडेत द्विशतक झळकावले आहे.
चोप्राने कबूल केले की जर भारत तिसरा सलामीवीर शोधत असेल तर शिखर धवन संघाचा भाग नसल्यामुळे निःसंशयपणे किशन हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, मधल्या फळीत ओपन करण्यासाठी डावखुऱ्या फलंदाजाची ऑडिशन घेतली जात असेल तर तो ऑडिशन देऊ शकत नाही, असे त्याने सांगितले.