भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. या दोघांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या वनडेत विजय मिळवला. यासह संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर बीसीसीआयने (BCCI) सामनावीर कुलदीप यादव आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जडेजा सर्वप्रथम कुलदीपच्या हेअरस्टाइलचे कौतुक करतो आणि म्हणतो, 'माझ्यासोबत कुलदीप यादव उपस्थित आहे, ज्याने या उन्हातही भारतातून मस्त हेअरस्टाईल आणली आहे. तसेच विराट कोहलीने घेतलेल्या जबरदस्त झेलचे कौतुक केले आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)