IND vs ENG 1st Test 2025 Day 1 Lunch: चांगली सुरुवात केल्यानंतर, भारताने लंच पर्यंत गमावल्या दोन विकेट, साई सुदर्शन शुन्यावर बाद; भारत 92/2

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून साई सुदर्शन पदार्पण करणार आहेत. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने लंच पर्यंत दोन विकेट गमावून 92 धावा केल्या आहे.

IND vs ENG 1st Test 2025 Day 1 Lunch: चांगली सुरुवात केल्यानंतर, भारताने लंच पर्यंत गमावल्या दोन विकेट, साई सुदर्शन शुन्यावर बाद; भारत 92/2
IND vs ENG (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जात आहे. यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही केली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून साई सुदर्शनने पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने लंच पर्यंत दोन विकेट गमावून 92 धावा केल्या आहे. तर यशस्वी जयस्वाल 42 धावांवर खेळत आहे.

कसोटी पदार्पणात साई सुदर्शन शुन्यावर बाद

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीयसंघाने चांगली सुरुवात केली. सलामीसाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने पिचवर चांगला वेळ घालवला आणि स्कोरबोर्ड चालू ठेवला. दोन्ही खेळाडूंनी चागले शार्टस खेळले. पण लंच ब्रेकच्या दोन ओव्हर आधी घात झाला आणि केएल राहुने  42 धावांवर पहिली विकेट फेकली. त्यानंतर कसोटी सामन्यात पदार्पण करणारा साई सुदर्शन शुन्यावर बाद झाला. इंग्लंडकडून ब्रायडन कार्से आणि बेन स्टोक्सला 1-1 विकेट मिळाली.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 05:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).