Abdul Samad Quick Facts: सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा जम्मू-काश्मीरचा तडाखेबाज फलंदाज अब्दुल समद बद्दल घ्या जाणून
या सामन्यात हैदराबादच्या संघात 18 वर्षीय फलंदाज अब्दुल समद (Abdul Samad) याला प्ले इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा अकरावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनराइजर्स (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादच्या संघात 18 वर्षीय फलंदाज अब्दुल समद (Abdul Samad) याला प्ले इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. स्फोटक फलंदाज समद हा जम्मू-काश्मीर रणजी क्रिकेट संघाचा एक भाग आहे. आयपीएलच्या लिलावात त्याला हैदराबादने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले होते. यावेळी अब्दुल समद हा आयपीएलमध्ये जम्मू-काश्मीरमधून निवडलेला एकमेव खेळाडू होता. तर, अब्दुल समद बदल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
अब्दुल समद 2019 मध्ये फर्स्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच तडाखेबाज फलंदाजीसाठी त्याला ओळखले जाते. डावखुरा फलंदाज अब्दुल समदने आतापर्यंत 10 फर्स्ट क्लास सामन्यात 112 स्ट्राईक रेटने 592 धावा केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 शतक आणि 3 अर्धशतक ठोकले आहेत. लिस्ट ए सामन्यात त्याचा स्ट्राईक रेट 125 आहे. दरम्यान, 8 सामन्यात त्याने 3 अर्धशतकच्या मदतीने 237 धावा केल्या आहेत. तर, 11 टी-10 सामन्यात 137 च्या स्ट्राईक रेटने 240 धावा केल्या आहेत. तसेच अब्दुल समद हा पार्ट टाईम लेग स्पिन म्हणून गोलंदाजी देखील करतो. हे देखील वाचा- Five Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार
ट्विट-
दिल्ली कॅपिटल्स:
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिखर धवन, शिमरन हेटमीयर, अक्षर पटेल, मार्कस स्टोनिस, अमित मिश्रा, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, एरिक नॉर्टजे.
सनरायझर्स हैदराबाद:
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, रशीद खान, अब्दुल समद, खलील अहमद आणि टी नटराजन