GT vs MI IPL 2023 Qualifier 2: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज चुरशीची लढत, सर्वांच्या नजरा या दिग्गज खेळाडूंवर
या सामन्यात गुजरात टायटन्सची कमान हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) असेल, तर दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळताना दिसणार आहे.
GT vs MI: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) दुसरा क्वालिफायर सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. या सामन्यात गुजरात टायटन्सची कमान हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) असेल, तर दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळताना दिसणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आजचा सामना जोही संघ जिंकेल, त्याचा सामना रविवारी, 28 मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता चेन्नई सुपर किंग्जशी होईल. आता दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील
कॅमेरॉन ग्रीन
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने 23 चेंडूत 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कॅमेरून ग्रीनने आतापर्यंत 422 धावा केल्या असून 6 विकेट्सही घेतल्या आहेत. या सामन्यातही मुंबई इंडियन्स संघाला कॅमेरून ग्रीनकडून मोठ्या आशा आहेत.
सूर्यकुमार यादव
मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 15 सामन्यात 544 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत सूर्यकुमार यादवने 1 शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. या सामन्यातही सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करू शकतो.
आकाश मधवाल
गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आकाश मधवाल आहे. आकाश मधवालने आतापर्यंत 7 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यातही तो चांगली कामगिरी करू शकतो.
शुभमन गिल
तो गुजरात टायटन्स संघाचा सलामीचा फलंदाज आहे. शुभमन गिलने आरसीबीविरुद्ध शतक झळकावले आहे. शुभमन गिलने या स्पर्धेत 15 सामन्यात आतापर्यंत 722 धावा केल्या आहेत. या सामन्यातही बॅटने चांगले योगदान देऊ शकतो.
रशीद खान
अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खानने आतापर्यंत 15 सामन्यात 25 विकेट्स घेत 125 धावा करत चमकदार कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात रशीद खान आपल्या बॅट आणि बॉलने गोंधळ घालू शकतो. (हे देखील वाचा: GT vs MI IPL 2023 Qualifier 2: अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी गुजरात आणि मुंबई भिडणार, खेळपट्टीच्या अहवालावरून जाणून घ्या कोण आहे कोणावर भारी)
मोहम्मद शमी
गुजरात टायटन्सचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद शमीने आतापर्यंत 26 विकेट घेतल्या आहेत. आजच्या महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाला मोहम्मद शमीकडून मोठ्या आशा आहेत.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, विष्णू विनोद, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.