RR vs LSG, IPL 2024 4th Match: राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात उद्या होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
दोन्ही संघ आपला सलामीचा सामना चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे.
RR vs LSG, IPL 2024 4th Match: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या (IPL 2024) हंगामातील चौथा सामना उद्या म्हणजेच 24 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात होणार आहे. सुपर संडेचा हा पहिला सामना राजस्थानच्या घरच्या मैदानावर जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. दोन्ही संघ आपला सलामीचा सामना चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. त्याचबरोबर संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सज्ज आहे. तथापि, लखनौ सुपर जायंट्स संघात क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरन सारखे महान फलंदाज आहेत, जे कधीही सामन्याचा मार्ग बदलू शकतात. त्यामुळे हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
सर्वांच्या नजरा असतील या खेळाडूंवर
केएल राहुल: लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचा या मैदानावर आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धचा विक्रम खूप चांगला आहे. या सामन्यात केएल राहुलही मोठी धावसंख्या करू शकतो.
युझवेंद्र चहल: राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहलने त्याच्या घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. युजवेंद्र चहलने या मैदानावर 11 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहल लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध कहर करू शकतो.
शिवम मावी: लखनौ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आहे. शिवम मावीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. या काळात शिवम मावीने 13 विकेट घेतल्या आहेत.
दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रायन पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, शिवम मावी, शमर जोसेफ, रवी बिश्नोई, मोहसिन खान.