Kolkata Knight Riders Beat Sunrisers Hyderabad: रोमहर्षक सामन्यात कोलकाताने हैदराबादचा चार धावांनी केला पराभव, हेनरिक क्लासेनची वादळी खेळी व्यर्थ

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने या विजयासह स्पर्धेची सुरुवात केली.

Kolkata Knight Riders Beat Sunrisers Hyderabad: रोमहर्षक सामन्यात कोलकाताने हैदराबादचा चार धावांनी केला पराभव, हेनरिक क्लासेनची वादळी खेळी व्यर्थ

KKR vs SRH IPL 2024 3rd Match: आयपीएलच्या 17 व्या मोसमातील (IPL 2024) तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) संघ यांच्यात सामना होणार आहे, दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने या विजयासह स्पर्धेची सुरुवात केली. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 208 धावा केल्या. कोलकाता नाइट रायडर्ससाठी स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 204 धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबादकडून स्फोटक हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणाने सर्वाधिक तीन बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 11:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).