कोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार
भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह याने इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत अडथळा आणण्यासाठी आणि स्वत:ला बळकट करण्यासाठी कोविड-19 चीनची योजना म्हटले आहे. चिनी अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करीत कोरोना व्हायरस पसरवून जगाला धोक्यात घातल्याबद्दल हरभजनने “चिनी लोकांना” फटकार लगावली आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उत्पत्तीसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी तिचे मूळ चीनच्या (China) वुहानमध्ये आहे असे लोकांचे मत आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे आजवर जगभरात 3.5 लाख हुन अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. काहीजण म्हणतात की ते लॅबमध्ये तयार केले गेले आहे, तर काहीजण वटवागुळमुळे पसरल्यासह म्हणतात. भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत अडथळा आणण्यासाठी आणि स्वत:ला बळकट करण्यासाठी कोविड-19 (COVID-19) चीनची योजना म्हटले आहे. चिनी अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करीत कोरोना व्हायरस पसरवून जगाला धोक्यात घातल्याबद्दल हरभजनने “चिनी लोकांना” फटकार लगावली आहे. 28 मे रोजी चीनमध्ये कोरोना व्हायरसचे एकही नवीन प्रकरण पाहिले नसल्याचा दावा करणाऱ्या वृत्तावर हरभजनचे ट्वीटवरून चीनवर आरोप केला. चीनला पीपीई किट, मास्क इत्यादी जगाला विकून स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि कोविड-19 च्या माध्यमातून इतरांना कमकुवत करण्याची चीनची योजना असल्याचे भज्जींचे मत आहे. (Coronavirus: इंग्लिश प्रीमियर लीगच्या क्लबमधील आणखी चार जणांना कोरोनाची बाधा, संक्रमितांची संख्या 12 वर पोहचली)
“अशी योजना होती... हा कोरोना विषाणू संपूर्ण जगात पसरवा ..प्रत्येकाला याचा त्रास होत असताना ते आनंदी राहून पाहणार... संपूर्ण जगासाठी पीपीई किट्स, मास्क इत्यादी बनवून त्यांची अर्थव्यवस्था बळकट करणं,” असं भज्जीने ट्विटमध्ये म्हटलं. चीनने हे सर्व जाणूनबुजून केले असे भज्जीचे मत आणि चीनमध्ये होणारा कोरोनाचा परिणाम होताना पाहून ट्विटरवरून त्याने राग व्यक्त केला.
हरभजनने शेअर केलेल्या स्टोरीनुसार, “मुख्य भूप्रदेशात 28 मेच्या अखेरीस चीनमध्ये कोरोना व्हायरसची कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नाही.” असे देशाच्या आरोग्य प्राधिकरणाने शुक्रवारी सांगितले. नॅशनल हेल्थ कमिशननेही 28 मे रोजी पाच नवीन अॅम्म्प्टोमॅटिक कोरोना व्हायरस प्रकरणांची पुष्टी केली आहे. याआधी, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कोरोनाच्या प्रसारासाठी चीनवर जोरदार हल्ला चढवला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)