जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती दर्शनाला पोहचला ब्रेट ली

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेश मंडळाला ब्रेट लीने दिली भेट

Brett Lee at the GSB Seva Mandal in Sion. (Photo: @ANI/Twitter)

मुंबई :  गणेश चतुर्थी पासून पुढील दहा दिवस सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. घरगुती गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही भक्त उत्साहाने गणेश मूर्तीचं दर्शन घेत आहे. गणपती बाप्पाचं अप्रूप केवळ भारतीयांना नव्हे तर परदेशी नागरिकांनाही आहे. यंदा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ब्रेट ली यानेदेखील जीएसबी सेवा  मंडळ, किंग्ज सर्कल येथील गणपतीचं दर्शन घेतलं. भारत देश हा दुसरं घर समजणार ब्रेट ली यापूर्वी अनेक भारतीय सणांचा आनंद लुटताना दिसला आहे.

भारतीय वेशभूषेत ब्रेट ली

जी एस बीच्या गणपतीची ओळख मुंबईतील श्री मंत गणपती अशी आहे. या गणपतीची आरास चांदीमध्ये केलेली आहे. सोन्याच्या आभूषणांनी जी एसबीचा गणपती मढलेला आहे. किंग्ज सर्कलच्या या गणपतीला भेट देताना ब्रेट ली पिवळा कुडता आणि पायजमा अशा अस्सल भारतीय पारंपारीक वेशभूषेत आला होता. सध्या Asia Cup 2018 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर म्हणून ब्रेट ली भरतामध्ये आहे.  आगामी Asia Cup च्या कॉमेंट्री टीमचाही ब्रेट ली एक भाग आहे. मुंबईतील 'या' लोकप्रिय गणपती मंडळांना नक्की भेट द्या !

 ब्रेट लीचा विश्वास

विराट कोहलीचा अपेक्षेप्रमाणे परफॉर्मन्स होत नसल्याने भविष्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर भारतीय फलंदाजीची भिस्त आहे. असा ब्रेट लीचा विश्वास आहे. Asia Cup मध्ये या दोन खेळाडूंच्या परफॉर्मन्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

CSK vs PBKS, TATA IPL 2025 49th Match Pitch Report: चिदंबरम स्टेडियमवर पंजाबचे फलंदाज कि चेन्नईचे गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल

CSK vs PBKS T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्जची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर

CSK vs PBKS Head to Head Record: पंजाब आणि चेन्नई यांच्यात हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ, वाचा एका क्लिकवर

Advertisement

BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा डाव 444 धावांवर संपला; झिम्बाब्वेवर 217 धावांची मजबूत आघाडी, स्कोअरकार्ड येथे पहा

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement