World Cup 2019 Final: वर्ल्ड कप फायनल सामन्यात सुपर-ओव्हर आधी इंग्लंडच्या बेन स्टोक्सने घेतला होता सिगरेट ब्रेक, जाणून घ्या कारण

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या आधी स्वत:ला तणाव मुक्त करण्यासाठी 'सिगरेट ब्रेक' घेतला होता असे इंग्लंडच्या विश्वचषक विजयाशी संबंधित नवीन पुस्तकात नमूद केले आहे. अगदी एक वर्षापूर्वी इंग्लंडने देशात आयोजित वनडे वर्ल्ड कपच्या थरारक अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.

बेन स्टोक्स (Photo Credit: Getty)

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) न्यूझीलंडविरुद्ध मागील वर्षी वर्ल्ड कपच्या अंतिम (World Cup Final) सामन्यात सुपर ओव्हरच्या आधी स्वत:ला तणाव मुक्त करण्यासाठी 'सिगरेट ब्रेक' घेतला होता असे इंग्लंडच्या विश्वचषक विजयाशी संबंधित नवीन पुस्तकात नमूद केले आहे. अगदी एक वर्षापूर्वी इंग्लंडने देशात आयोजित वनडे वर्ल्ड कपच्या थरारक अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. दोन्ही टीममधील हा सामना वर्ल्ड कप इतिहासातील सर्वश्रेष्ठ फायनल ठरला. त्या ऐतिहासिक विजयाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 'Morgan's Men: The Inside Story of England's Rise from Cricket World Cup Humiliation to Glory' या पुस्तकात त्या दिवशी लॉर्ड्समध्ये स्टोक्सला जाणवलेल्या दबावाचा खुलासा झाला. निक हॉल्ट आणि स्टीव्ह जेम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे काही भाग stuff.co.nz मध्ये प्रकाशित झाले आहेत. (On This Day in 2019: आजच्या दिवशी आजवरच्या सर्वश्रेष्ठ वनडे सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून इंग्लंड बनला विश्वविजेता, ICCच्या या नियमाने केले हैराण)

या पुस्तकानुसार, "सुपर ओव्हरपूर्वी 27,000 हजार प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये आणि सर्वत्र कॅमेरे पाहून एकांत शोधणे कठीण होते. पण बेन स्टोक्स बर्‍याच वेळा लॉर्ड्सवर खेळला होता आणि त्यास ओळखत होता. जेव्हा इयन मॉर्गन इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये ताणतणाव कमी करण्याचा आणि धोरण आखण्याचा प्रयत्न करीत होता तेव्हा स्टोक्सने स्वत:साठी काही क्षण चोरले." पुस्तकानुसार, "तो धूळ आणि घामाने भिजला होता. त्याने तणावातून दोन तास 27 मिनिट फलंदाजी केली. स्टोक्सने काय केले? तो परत इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्येअंघोळ करायला गेला. तिथे त्याने सिगारेट पेटवली आणि काही मिनिटे शांततेत घालविली."

29 वर्षीय स्टोक्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. स्टोक्सने नाबाद 84 धावा आणि सुपर-ओव्हरमध्ये अजून 8 धावा केल्या. 14 जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 241 धावा केल्या. इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी 242 धावांची आवश्यकता होती, परंतु यजमान संघानेही 50 ओव्हरमध्ये 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. त्यानंतर सुपर-ओव्हरही टाय झाली, पण सार्वधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now