एशिया कप २०१८: भारताचा पाकिस्तानवर ९ गडी राखून दणदणीत विजय

भारताकडून गोलंदाजी करत असलेल्या बुमराह, कुलदीप आणि चहलने प्रत्येकी २ गडी बाद केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने जबरदस्त खेळी केली.

क्रिकेट: भारतासमोर पाकचे लोटांगण (Photo Credit- File Photo)

एशिया कप २०१८साठी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला पुरेपूर इंगा दाखवला आहे. या सामन्यात एक-दोन नव्हे तर, तब्बल ९ गडी राखून भारताने पाकिस्तानला पराभूत केले. पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांच्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २३७ धावा करत विजयासाठी २३८ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाटलाग करताना भारताने ९ गडी राखून विजय मिळवला

पहिल्या डावात पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने ७८ धावा केल्या. तर, कर्णधार सरफराज अहमदने ४४ धावांचे योगदना दिले. भारताकडून गोलंदाजी करत असलेल्या बुमराह, कुलदीप आणि चहलने प्रत्येकी २ गडी बाद केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने जबरदस्त खेळी केली. हिटमॅन शर्मा आणि गब्बर शिखर धवनने तडाखेबंद फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांची ऐशी की तैशी करुन ठेवली. शिखर धवनने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १५वे शतक झळकावले. धवन ११४ धावा करुन बाद झाला. तर शिखरने कर्णधार शर्माला चांगली साथ दिली. त्यामुळे संघ विजयाच्या टप्प्यावर जाऊन पोहोचला.

कप्तान रोहित शर्माने १११ धावांची शानदार खेळी केली. भारतीय संघाने पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा पराभवाची धुळ चारली आहे. एशिया कपसाठी भरताचा हा चौथा विजय आहे. भारतीय फलंदाजांनी चांगली खेळी केली असली तरी, गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली. त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना वेळीच रोखण्यात भारताला यश आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

India vs England, ODI Series 2025: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अशी असू शकते टीम इंडिया! 'या' प्रतिभावान खेळाडूंना मिळू शकते संधी

IND vs ENG T20I And ODI Series Schedule: भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून खेळवली जाणार टी-20 आणि वनडे मालिका, नोट करुन घ्या सामन्याची तारीख आणि वेळ

Gautam Gambhir Coaching Report Card: एक-दोन नव्हे तर 11 लाजिरवाणे रेकॉर्ड, गौतम गंभीरचे कोचिंग रिपोर्ट कार्ड पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य

India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध 'अशी' आहे कामगिरी, दोन्ही संघांची येथे पाहा आकडेवारी

Share Now