Egypt's Temperature: हाय गर्मी ! इजिप्त देशामध्ये तापमान विक्रमी उंच्चाकावर, हवामान विभागाकडून 50 अंशाची नोंद

वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे.

Summer Advisory By Health Ministry

Egypt's Temperature: इजिप्तमध्ये विक्रमी तापमान 50.9°C (123.6°F) पर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. अलिकडेच इजिप्शियन अस्वान शहरात तापमान 51 अंश किंवा कदाचित त्याहून जास्त नोंदवले गेले आहे. देशातील हवामान विभागाने तापमानाची नोंद केली आहे. आफ्रिकेतील हवामान नोंदींच्या इतिहासात 2018 मध्ये अल्जेरियातील ओअर्गला स्टेशनवर 51.3 अंश नोंदवले गेलेले सर्वोच्च तापमान होते. (हेही वाचा- वॉशिंग्टन येथील सिएटलजवळ विमान कोसळलं, युएस अंतराळवीर विल्यम अॅंडर्स यांचा मृत्यू )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)