Nigeria Boat Accident: नायजेरियात लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; तब्बल 105 जणांचा मृत्यू- Reports

मंगळवारी दुपारपर्यंत, अधिकारी आणि स्थानिक नदीत मृतदेह शोधत होते. नायजेरियामध्ये अनेकदा खराब असतात त्यामुळे येथे नदीतून वाहतूक आणि व्यापार सामान्य आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

नायजेरियामधून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर येत आहे. उत्तर नायजेरियात लग्नाहून परतणाऱ्या रहिवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून सुमारे 105 लोक ठार झाले आहे. पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. या अपघातामध्ये वाचलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नायजर राज्याजवळील क्वारा राज्यातील नायजर नदीवर सोमवारी पहाटे बोट उलटली, असे पोलीस प्रवक्ते ओकासान्मी अजयी यांनी सांगितले. नायजर राज्यातील एग्बोटी गावात रात्रभर चाललेला हा लग्न समारंभ संपवून पिडीत लोक परतत होते, त्यावेळी हा अपघात घडला. हा अपघात साधारण पहाटे 3 वाजता घडल्यामुळे अनेक तास घटनेची माहिती मिळू शकली नाही.

मंगळवारी दुपारपर्यंत, अधिकारी आणि स्थानिक नदीत मृतदेह शोधत होते. नायजेरियामध्ये अनेकदा खराब असतात त्यामुळे येथे नदीतून वाहतूक आणि व्यापार सामान्य आहे. नायजेरियात अनेक ठिकाणी स्थानिकरित्या बनवलेल्या जहाजांचा वापर सामान्यतः वाहतुकीसाठी केला जातो. बहुतेक अपघात हे ओव्हरलोडिंग आणि खराब देखभाल केलेल्या बोटींच्या वापरामुळे होतात. (हेही वाचा:  न्यूयॉर्कच्या लॉकपोर्ट गुहेच्या आत 36 पर्यटक असलेली बोट उलटली; 12 लोकांना वाचवण्यात यश)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement