Congo Boat Accident: काँगोमध्ये क्वा नदीवर बोट उलटली; 80 हून अधिक जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश

या बोट दुर्घटनेनंतर राष्ट्रपतींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कांगोमध्ये जलमार्गावर बोट अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.

Congo Boat Accident: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या (Democratic Republic of Congo) माई-एनडोम्बे प्रांतातील (Mai-Ndombe Province) क्वा नदीवर (River Kwa) बोटीच्या अपघातात 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ही दुर्घटना घडली. राष्ट्रपती फेलिक्स त्शिसेकेडी (Felix Tshisekedi) यांनी याबाबत माहिती दिली आहे. या बोट दुर्घटनेनंतर राष्ट्रपतींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कांगोमध्ये जलमार्गावर बोट अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी जहाजे अनेकदा मालाने भरलेली असतात तसेच त्यावरील वजन क्षमतेपेक्षा जास्त असते त्यामुळे अपघात घडतात. (हेही वाचा: Kuwait Building Fire: कुवेतमधील मंगफ परिसरात भीषण आग; अनेक भारतीयांसह 48 लोकांचा मृत्यू, 30 हून अधिक गंभीर जखमी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now