ZIM vs PAK 2nd T20I: झिम्बाब्वेने मिळवला ऐतिहासिक विजय, पाकिस्तान संघाला 99 धावांवर ढेर करत मालिकेत केली 1-1 ने बरोबरी

हरारे येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने दिलेल्या 119 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तान विरुद्ध टी-20 मध्ये झिम्बाब्वेचा हा पहिला विजय ठरला आहे. यापूर्वी त्यांना तब्बल 15 सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.

झिम्बाब्वे क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

ZIM vs PAK 2nd T20I: हरारे (Harare) येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने (Zimbabwe) दिलेल्या 119 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान (Pakistan) संघ अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तान विरुद्ध टी-20 मध्ये झिम्बाब्वेचा हा पहिला विजय ठरला आहे. यापूर्वी त्यांना तब्बल  15 सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. या ऐतिहासिक विजयासह झिम्बाब्वेने तीन सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. लक्ष्याच्या पाठलाग करताना पाकिस्तानने एकावेळी 78 धावांवर 3 विकेट गमावल्या पण अखेर पर्यंत ते अधिक धावाच जोडू शकले आणि 19.5 ओव्हरमध्ये 99 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement