IPL Auction 2025 Live

West Indies Beat India: पाचव्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजने भारताचा 8 विकेट्सनी केली पराभव, टीम इंडियाने मालिकाही गमावली

T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला गेला.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला गेला. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात, वेस्ट इंडिज संघाने टीम इंडियाचा आठ विकेट्सने पराभव केला आणि मालिका 3-2 ने जिंकली. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात नऊ गडी गमावून 165 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 61 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक चार बळी घेतले.लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने 18 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रँडन किंगने सर्वाधिक नाबाद 85 धावा केल्या. टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Akil Hussain Akshar Patel Alzarri Joseph Arshdeep Singh Avesh Khan and Mukesh Kumar Brandon King Hardik Pandya India India vs West Indies T20 Series 2023 Ishan Kishan Jason Holder Johnson Charles Kuldeep Yadav Kyle Mayers Nicholas Pooran Obed McCoy Odion Smith Oshane Thomas Ravi Bishnoi Romario Shepherd Roston Chase Rovman Powell Sanju Samson Shai Hope Shimron Hetmyer Shubman Gill Surya Kumar Yadav T20 Series Team India Tilak Verma Umran Malik West Indies Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal अकील हुसेन अक्षर पटेल अर्शदीप सिंग अल्झारी जोसेफ आवेश खान आणि मुकेश कुमार इशान किशन उमरान मलिक ओडियन स्मिथ ओबेद मॅककॉय ओशान थॉमस काइल मेयर्स कुलदीप यादव जेसन होल्डर जॉन्सन चार्ल्स टिळक वर्मा टी-20 मालिका टीम इंडिया निकोलस पूरन ब्रँडन किंग भारत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यशस्वी जैस्वाल युझवेंद्र चहल रवी बिश्नोई रोमॅरियो शेफर्ड रोव्हमन पॉवेल रोस्टन चेस वेस्ट इंडिज वेस्ट कुमार. इंडीज शाई होप शिमरॉन हेटमायर शुबमन गिल संजू सॅमसन सूर्य कुमार यादव हार्दिक पांड्या