Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये फूट, शान मसूद आणि शाहीन आफ्रिदीची तो व्हिडिओ आला समोर (Watch Video)

पाकिस्तानने पहिला डाव 448 धावांवर घोषित केला. यानंतर संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 565 धावा केल्या. दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता 30 धावा करत सामना जिंकला. या मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघात सर्व काही सुरळीत चालले नाही.

Photo Credit - X

Bangladesh National Cricket Team Beat Pakistan National Cricket Team: बांगलादेशने रावळपिंडीत इतिहास रचला आहे. त्यांनी पाकिस्तानचा त्यांच्याच घरात पराभव केला. बांगलादेशने कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 गडी राखून जिंकला. पाकिस्तानने पहिला डाव 448 धावांवर घोषित केला. यानंतर संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 565 धावा केल्या. दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता 30 धावा करत सामना जिंकला. या मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघात सर्व काही सुरळीत चालले नाही आणि खेळाडूंमध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगत आहेत. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार शान मसूद मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीशी वाद घालताना दिसला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे सामन्याच्या पाचव्या दिवशी शाहीन शाह आफ्रिदी संघासोबत सामूहिक संभाषणादरम्यान कर्णधार शान मसूदचा हात खांद्यावरून काढताना दिसला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement