U19 Women’s T20 WC Finale 2023, IND W vs ENG W: टीम इंडियाची घातक गोलंदांजी, इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 68 धावांत झाला गारद; भारतासमोर विजयासाठी 69 धावांचे लक्ष्य

टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ निर्धारित 17.1 षटकांत अवघ्या 68 धावांत गारद झाला.

IND vs ENG (Photo Credit - Twitter)

ICC अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे. अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतच्या प्रवासात, स्फोटक फलंदाज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ निर्धारित 17.1 षटकांत अवघ्या 68 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक 19 धावा केल्या. टीम इंडियाकडून टीटा साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अंतिम सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 20 षटकात 69 धावा करायच्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement