IND vs NED सामन्यात Shubman Gill ने लगावला 95 मीटरचा गगन चुंबी उंच षटकार, पाहा व्हिडिओ
2023 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल.
दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडियाचा सामना आज बंगळुरूमध्ये नेदरलँडशी (IND vs NED) होत आहे. टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. 2023 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल. दरम्यान, टीम इंडियाच्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आहे. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतकीय पारी खेळून बाद झाले. दरम्यान, आर्यन दत्तच्या दुसऱ्या षटकात शुभमन गिलने 95 मीटरचा लांबलचक षटकार ठोकला. चेंडू चिन्नास्वामीच्या छताला जावून लागला. (हे देखील वाचा: अफगाणिस्तानचा खेळाडू Rahmanullah Gurbaz ने सर्व भारतीय चाहत्यांची जिंकली मने, दिवाळीपूर्वी गरजू लोकांना केली मदत (Watch Video)
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)