Asia Cup 2023: शब्बास! आशिया चषकपुर्वी Shreyas Iyer ने आपल्या फॉर्म आणि फिटनेचा दिला पुरावा, सराव सामन्यात ठोकल्या 199 धावा
अय्यरने बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात 199 धावांची उत्कृष्ट खेळी करून आपला फॉर्म आणि फिटनेस या दोन्हीचा पुरावा दिला आहे. याआधी, दुसऱ्या सराव सामन्यात 50 षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर त्याने 38 षटके फलंदाजी केली.
Shreyas Iyer Fitness: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या तयारीत असलेल्या टीम इंडियाला (Team India) श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) फॉर्म आणि फिटनेस पाहून खूप दिलासा मिळाला असेल. मॅच तंदुरुस्त होण्याच्या मोहिमेत गुंतलेला अय्यर संपूर्ण वेळ क्षेत्ररक्षणातच घालवत नाही, तर दीर्घ खेळी खेळून संघ व्यवस्थापनालाही सुटकेचा नि:श्वास टाकण्याची संधी देत आहे. अय्यरने बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात 199 धावांची उत्कृष्ट खेळी करून आपला फॉर्म आणि फिटनेस या दोन्हीचा पुरावा दिला आहे. याआधी, दुसऱ्या सराव सामन्यात 50 षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर त्याने 38 षटके फलंदाजी केली. सराव सामन्यांमध्ये अय्यरची ही खेळी पाहून निवडकर्त्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला की वनडे संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या शोधात असलेल्या टीम इंडियाचा प्रश्न सुटलेला दिसतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)