PBKS vs GT, IPL 2023 Live Score Update: पंजाब किंग्ज संघाला दुसरा धक्का, सलामीवीर शिखर धवन बाद

मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत.

PBKS vs GT (Photo Credit - Twitter)

आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 18वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. त्यांना दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पंजाब किंग्ज संघाचा स्कोर 28/2.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement