RR vs RCB, IPL 2024 Eliminator: हवेत उडी मारताना Rovman Powell ने पकडला फॅफचा अप्रतिम झेल, RCB चा कर्णधारही झाला शाॅक, पाहा व्हिडिओ

राजस्थान रॉयल्सच्या रोव्हमन पॉवेलने (Rovman Powell) ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर अप्रतिम डायव्ह टाकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसचा उत्कृष्ट झेल घेतला.

Rovman Powell Catch Video: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये (IPL 2024) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RR vs RCB) यांच्यात एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर, विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सच्या रोव्हमन पॉवेलने (Rovman Powell) ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर अप्रतिम डायव्ह टाकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसचा उत्कृष्ट झेल घेतला. डावातील 5 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या बोल्टने चौथा चेंडू शॉर्ट टाकला. या चेंडूवर फाफने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू नीट बॅटवर आला नाही आणि डीप मिडविकेटवर उभ्या असलेल्या पॉवेलने पुढे डायव्हिंग करत उत्कृष्ट झेल घेतला.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement