इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान रोहित शर्माची पत्नी Ritika Sajdeh ने शेअर केली 'All Eyes on Rafah' मोहिमेला पाठींबा दर्शवणारी इंस्टाग्राम स्टोरी; 'खाते हॅक झाले का?' चाहत्यांचा प्रश्न

या हिंसाचाराच्या मुख्य भागांपैकी एक म्हणजे दक्षिण गाझामधील ‘रफाह’ हे शहर. हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते, त्यानंतर इस्रायलने रफाह शहरावर हल्ला करून प्रत्युत्तर दिले.

Ritika Sajdeh

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह सध्या चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरु असलेले युद्ध. रितिकाने 'ऑल आइज ऑन रफाह' मोहिमेला पाठींबा दर्शवणारी एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष सुरु आहे. या हिंसाचाराच्या मुख्य भागांपैकी एक म्हणजे दक्षिण गाझामधील ‘रफाह’ हे शहर. हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते, त्यानंतर इस्रायलने रफाह शहरावर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. आता गाझामधील नरसंहाराकडे लक्ष वेधण्यासाठी आणि युद्धविरामाची मागणी करण्यासाठी सध्या 'ऑल आइज ऑन रफाह' ही मोहीम चालवली जात आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर 'ऑल आइज ऑन रफाह'ला पाठींबा देणारे संदेश पोस्ट केले आहेत. रितिकाच्या खात्यावरूनही अशी पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारी स्टोरी पोस्ट केली गेली. मात्र त्यानंतर आता चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे की, रितिकाने खरच अशी स्टोरी शेअर केली का तिचे खाते हॅक झाले आहे. (हेही वाचा: Papua New Guinea landslide: पापुआ न्यू गिनी भूस्खलनात 2,000 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे संयुक्त राष्ट्रांना मदतीच्या मागणीचे पत्र)

रितिका सजदेहची इंस्टाग्राम स्टोरी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)