Ritika Sajdeh Drops ‘Yellow Heart’: मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात सर्व ठीक? CSK च्या पोस्टवर रितिका सजदेहने दिली अशी प्रतिक्रिया

जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने त्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. सीएसकेच्या या पोस्टवर रितिकाने पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजीद्वारे कमेंट केली आहे.

Ritika Sajdeh Drops ‘Yellow Heart’

इंडियन प्रीमियर लीग टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपल्या खेळाडूंची एका कुटुंबाप्रमाणे काळजी घेते. हा संघ लीगमधील सर्वोत्तम मानला जातो. संघातील वातावरण नेहमीच आनंददायी राहिले आहे. संघाच्या मालक नीता अंबानी अनेक वेळा खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटताना दिसल्या आहेत. मात्र, आयपीएल 2024 पूर्वी संघाने आपला चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवण्याचा निर्णय घेतल्याने संघातील वातावरण गंभीर झाले आहे. आता रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियावर हिटमॅनच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून, त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. अशीच एक प्रतिक्रिया रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहकडून आली आहे.

जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने त्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. सीएसकेच्या या पोस्टवर रितिकाने पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजीद्वारे कमेंट केली आहे. दुसरीकडे, मुंबईनेही रोहित शर्माच्या सन्मानार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, मात्र त्यावर रितिकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. (हेही वाचा: Hardik Pandya New Mumbai Indians Captain: आयपीएल 2024 साठी हार्दिक पंड्या असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार; रोहित शर्माला पदावरून हटवले)

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now