Kieron Pollard Hits Five Sixes: किरॉन पोलार्डकडून करामती रशीद खानची धुलाई, एकाच षटकात ठोकले पाच षटकार; पाहा व्हिडिओ

आज सदर्न ब्रेव्ह आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात साउथहॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सदर्न ब्रेव्हने ट्रेंट रॉकेट्सचा दोन गडी राखून पराभव केला आहे.

Photo Credit - X

SOU Beat TRE, 24th Match The Hundred Mens: द हंड्रेड मेन्स कॉम्पिटिशन 2024 चा 24 वा सामना तत्पूर्वी, ट्रेंट रॉकेट्सचा कर्णधार लुईस ग्रेगरीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ट्रेंट रॉकेट्स संघाने 100 चेंडूत 8 गडी गमावून 126 धावा केल्या. ट्रेंट रॉकेट्सकडून टॉम बँटनने सर्वाधिक 30 धावा केल्या. सदर्न ब्रेव्हसाठी वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी सदर्न ब्रेव्हला 100 चेंडूत 127 धावांची गरज होती. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सदर्न ब्रेव्ह संघाने 98 चेंडूत आठ गडी गमावून लक्ष्य गाठले. सदर्न ब्रेव्हसाठी किरॉन पोलार्डने सर्वात स्फोटक खेळी खेळली. किरॉन पोलार्डने 17 व्या षटकात राशिद खानला पाच षटकार ठोकले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement