RR vs SRH, Live Score Update: राजस्थानने हैदराबादसमोर ठेवले 215 धावांचे लक्ष्य, जोस बटलरचे शतक हुकले
दोन्ही संघांमधील हा 18 वा सामना आहे. याआधी झालेल्या 17 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी जवळपास बरोबरीने विजय आणि पराभव पत्करला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 52 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (RR vs SRH) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा 18 वा सामना आहे. याआधी झालेल्या 17 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी जवळपास बरोबरीने विजय आणि पराभव पत्करला आहे. राजस्थान रॉयल्सने 9 सामने जिंकले असून सनरायझर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची अलीकडची कामगिरीही सारखीच दिसते. या संघांनी या हंगामातील त्यांच्या शेवटच्या 5 सामन्यांपैकी 4-4 सामने गमावले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित 20 षटकात 2 गडी गमावून 214 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक 95 धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादकडून मार्को जॉन्सन आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकात 215 धावा करायच्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)