RR vs CSK IPL 2025 11th Match Live Scorecard: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Rajasthan Royals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 11 सामना रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळवला जात आहे. या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व तीन सामन्यासाठी रियान पराग करत आहे. तर, चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मथीशा पाथिराना