SL vs SA World Cup 2023 Live Score Update: क्विंटन डी कॉक शतक ठोकून बाद, श्रीलंकेला मिळाली दुसरी विकेट
वनडे विश्वचषकाच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SA vs SL) आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
Quinton De Kock Century: भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी क्रिकेट वनडे विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) आजच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SA vs SL) आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. हे मैदान फलंदाजांसाठी नेहमीच कठीण असते. या मैदानावर धावा काढणे कधीच सोपे नव्हते. त्यामुळेच या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघांना केवळ दोनदाच 300 धावांचा टप्पा गाठता आला आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने अवघ्या 84 चेंडूत आपले शतक पूर्ण करुन बाद झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा स्कोर 225/2 आहे.