PBKS vs RCB, IPL 2023 Match 27 Live Score Update: पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11
आयपीएलच्या 16व्या हंगामात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. ज्यामध्ये पंजाब किंग्जने पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. दु
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या (IPL 2023) मोसमातील 27 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. ज्यामध्ये पंजाब किंग्जने पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही पाचपैकी दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), फाफ डुप्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज.
पंजाब किंग्ज: अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.