PBKS vs CSK: शिखर धवनने रचला इतिहास; IPL मध्ये ही कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

या सामन्यापूर्वी त्याने 199 IPL सामन्यात 5998 धावा केल्या होत्या.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या IPL 2022 च्या 38 व्या सामन्यात शिखर धवनने इतिहास रचला आहे. या सामन्यात दोन धावा करताच शिखर धवन आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. धवनसाठी हा सामना खूप खास आहे, कारण हा धवनचा आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना आहे.

शिखर धवनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना 2 धावा करताच 6000 धावांचा टप्पा गाठला. या सामन्यापूर्वी त्याने 199 IPL सामन्यात 5998 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now