IPL 2024: मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच रोहित शर्माला भेटला पांड्या, पुढे काय झाले ते पाहा, Video मध्ये

जेव्हापासून रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तेव्हापासून चाहत्यांना याचा फारसा आनंद झालेला दिसत नाही.

Rohit Sharma And Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

आयपीएल 2024 (IPL 2024) सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी सर्व संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. जवळपास सर्वच खेळाडू आयपीएलसाठी आपापल्या संघात सामील झाले आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. जेव्हापासून रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तेव्हापासून चाहत्यांना याचा फारसा आनंद झालेला दिसत नाही. मात्र, या सगळ्यामध्ये संघाने सरावाला खूप आधी सुरुवात केली आणि आता कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच रोहित शर्माला भेटला आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)